१७ गडकिल्ल्यांच्या विकासाचा प्रस्ताव
By admin | Published: February 4, 2016 02:38 AM2016-02-04T02:38:04+5:302016-02-04T02:38:04+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पुरातत्त्व खात्याकडे रायगड जिल्ह्यातील १७ गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
रोहा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पुरातत्त्व खात्याकडे रायगड जिल्ह्यातील १७ गडकिल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये रोहा तालुक्यातील किल्ले बिरवाडी आणि अवचित गड यांचा विकास करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला.
महाराष्ट्र शासनातर्फे किल्ले रायगडावर गडकिल्ल्यांना ऊर्जितावस्था यावी आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे आणि महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जगासमोर यावा. रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला या माध्यमातून चालना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील कर्नाळा, खांदेरी, उंदेरी, कुलाबा किल्ला, कोर्लई किल्ला, लिंगाणा, मानगड, मुरुड-जंजिरा, पद्मदुर्ग, प्रबळगड, रायगड, रेवदंडा, सागर गड, सरस गड, सुधागड, बिरवाडी,अवचित गड या किल्ल्यांमध्ये लॅण्डस्केप डेव्हलपिंग, पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविणे, किल्ल्यावरील अवशेषांचे जतन करणे आदी बाबींचा समावेश आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रस्तावाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. (वार्ताहर)