महाड : नैसर्गिक साधनसंपत्तीतील जैव संपदेने पश्चिम घाट हा परिपूर्ण असला तरी या जैवविविधतेचे रक्षण करणे ही गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीकांत कवडे यांनी केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागातर्फे आयोजित वनऔषधी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कवडे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. धनाजी गुरव होते. विद्यार्थ्यांना वनऔषधी वनस्पतींची माहिती व्हावी, तसेच या वनऔषधी वनस्पतींचा अनेक असाध्य रोगांवर उपयोग व्हावा या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रा. लतिका मेहता, प्रा. प्रकाश कडलग् आदिंनी प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले.
जैवविविधतेचे रक्षण करा - डॉ. कवडे
By admin | Published: December 22, 2016 6:23 AM