सेंट जोसेफ शाळेवर महामोर्चा, पालकांचे ठिय्या आंदोलन, आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:40 AM2017-09-15T06:40:36+5:302017-09-15T06:40:50+5:30
मनमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाºया नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालकांनी आंदोलन केले होते. शाळा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले.
पनवेल : मनमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाºया नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालकांनी आंदोलन केले होते. शाळा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले.
वाढीव फीविरोधात पालकांनी आवाज उठवल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देण्याची मुजोरी शाळा प्रशासनाकडून वाढल्याने पालकांकडून आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी आंदोलक व शाळा व्यवस्थापनामध्ये दोनदा चर्चा झाली, मात्र सायंकाळपर्यंत योग्य तोडगा निघाला नसल्याने मोर्चाचे स्वरूप ठिय्या आंदोलनात झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. शाळा व्यवस्थापनाविरोधात निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली. परिमंडळ २ चे उपायुक्त नवी मुंबई पोलीस राजेंद्र माने यांनीही या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत काहीच तोडगा निघाला नव्हता.
आंदोलनात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील, गटनेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते रामदास शेवाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक संतोष शेट्टी, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका मुग्धा लोंढे, सुशीला घरत, विद्या गायकवाड, रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ंबैठकीत निघाला तोडगा
दिवसभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर सायंकाळी उशिरा पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, शाळा प्रशासन, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आदींसह प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. आयुक्तांनी फी वाढीसंदर्भात ताशेरे ओढत विद्यार्थ्यांकडून प्रलंबित शुल्क हे कमाल १५ हजारापर्यंत घेण्यात यावे असे ठरले. परिवहन शुल्कातही वाढ करू नये, तीन वर्षांचा ताळेबंद आयुक्त कार्यालयाला मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सादर करण्याचे आदेश दिले. आदेशाची पायमल्ली केल्यास कारवाईचा इशारा दिला.
दिवसभराच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शाळा प्रशासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. निर्देशाचे पालन केले नाही तर शाळेची मान्यता रद्द होणार आहे. आयुक्त तशा प्रकारचा प्रस्ताव देखील पुढे पाठवतील, आणि आपणही या संदर्भात नक्कीच पाठपुरावा करू.
- प्रशांत ठाकूर,
आमदार