शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवी मुंबई भाजपाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन

By कमलाकर कांबळे | Published: May 30, 2024 2:30 PM

गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली. 

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचे छायाचित्र  असलेले पोस्टर  पाडल्याच्या निषेधार्थ  जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात  भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष  संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी  आव्हाड यांच्या विरोधात  यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली. 

या आंदोलनामध्ये माजी महापौर सागर नाईक यांच्यासह   सतीश निकम, संपत शेवाळे, नवीन गवते,  विविध मोर्चाचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कोणत्याही गोष्टीची स्टंटबाजी करणे ही आव्हाड यांची जुनी सवय आहे. आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी  महामानवाचा अपमान करणाऱ्या आव्हाडांच्या कृतीचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतो आहे, असा हल्लाबोल जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केला.  

तर आव्हाड यांचे विचार सकारात्मक नसून  नकारात्मक आहेत. त्याच्यात राजकीय स्वार्थ दिसून येतो,  अशी टीका नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  दशरथ भगत यांनी केली. याप्रसंगी नवी मुंबई भाजपा  अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राजू शिंदे , नवी मुंबई भाजपा  युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर यांनीही  आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करीत कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा