तुर्भे डेपोत एनएमएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By नामदेव मोरे | Published: February 9, 2024 02:39 PM2024-02-09T14:39:04+5:302024-02-09T14:39:14+5:30
एनएमएमटीच्या बसेस रस्त्यावर बंद पडण्याच्या घटना वाढत आहे.
नवी मुंबई : एनएमएमटी बसच्या अपघातानंतर संतप्त जमावाने कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवले होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना असाव्या अशा मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तुर्भे डेपोमध्ये आंदोलन केले. उरण परिसरामध्ये गुरूवारी झालेल्या अपघातामध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला होताव दोन जण जखमी झाले होते. या घटनेनंतर नागरिकांनी एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच थांबवून ठेवले होते. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एनएमएमटीच्या बसेस रस्त्यावर बंद पडण्याच्या घटना वाढत आहे. देखभाल दुरूस्ती व्यवस्थीत केली नसेल व अपघात झाला किंवा इतर दुर्घटना घडल्यास कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषास बळी पडावे लागते. अशा स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमीक सेनेच्या सदस्यांनी तुर्भे डेपोमध्ये उरण परिसरात जाणारी वाहतूक एक ते दिड तास थांबविली होती. प्रशासनाने या मागण्यांवर योग्य विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.