"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

By नामदेव मोरे | Published: September 15, 2022 05:50 PM2022-09-15T17:50:47+5:302022-09-15T17:53:09+5:30

ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले.

Protest of Shiv Sena office bearers in Navi Mumbai Over Foxconn Vedanta Deal | "५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

"५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध"; शिवसेना पदाधिकाऱ्यांचं नवी मुंबईमध्ये आंदोलन

Next

नवी मुंबई - सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणाबाजी करून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे पुलाजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले. राज्यातील सरकारच्या उदासीनतेमुळे १.४५ लाख कोटी रूपयांचा वेदांता प्रकल्प गुजरातला गेला आहे. सरकारने महाराष्ट्राचे नुकसान केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ५० खोके एकदम ओके, ईडी सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

राज्य सरकार गुजरात हितासाठी काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, अतुल कुलकर्णी, शहर प्रमुख विजय माने, सोमनाथ वास्कर, प्रकाश पाटील, समीर बागवान,महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सरकारच्या धोरणांविरोधात यापुढेही तीव्र लढा देण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
 

Web Title: Protest of Shiv Sena office bearers in Navi Mumbai Over Foxconn Vedanta Deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.