नवी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वतीने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल वेळेत न लावल्याने मंगळवारी वाशी येथे निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असून यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नवी मुंबईच्या वतीने निदर्शने करण्यात आली. निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असून याला मुंबई विद्यापीठाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या निषेध मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निकालासंदर्भात अनेक समस्या याठिकाणी मांडल्या असून तीव्र असंतोष व्यक्त केला. यामध्ये नवी मुंबई, पनवेल तसेच मुंबई परिसरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली या निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भ्रष्ट कारभार थांबवून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली. या वेळी ‘कुलगुरू हटाओ, विद्यापीठ बचाओ’ अशा घोषणा करत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा निषेध व्यक्त करण्यात आला.
विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:19 AM