शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

सिडकोच्या गृहप्रकल्पाविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:23 PM

कामोठे रहिवाशांची निदर्शने : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी

कळंबोली : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाला कामोठे येथील रहिवाशांकडून तीव्र विरोध होतआहे. रविवारी या ठिकाणी निदर्शने करून प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या मागणीसाठी नागरी हक्क समितीने आंदोलन केले. याबाबत उच्च न्यायालयातसुद्धा याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर सेक्टर २८ येथे मोकळ्या जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पादन गटातील लोकांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. येथे ११ मजल्यांचे १७ टॉवर उभारले जाणार आहेत. या कामाकरिता पत्र्याचे कम्पाउंड घालण्यात आले आहेत. ही जागा पार्किंगकरिता तसेच लहान मुलांना खेळण्याकरिता ठेवण्यात यावी, अशी मागणी कामोठेकरांची आहे.

रेल्वे स्थानकाला लागूनच गृहनिर्माण प्रकल्प झाल्यास भविष्यात पार्किं ग, वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. ही जागा मोकळी असावी, असे मत कामोठेतील रहिवासी अमोल शितोळे यांनी व्यक्त केले आहे. सिडकोने जे नियोजन सांगितले, त्यामध्ये रेल्वे स्थानकासमोरची ही जागा मोकळी होती; परंतु आता या ठिकाणी टॉवर उभारून कामोठे वसाहत झाकण्याचा डाव आखला जात असल्याचे मंगेश आढाव यांचे म्हणणे आहे. ठेकेदाराने कामोठेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी हा रस्ता मोकळा करून दिला.

गेल्या काही दिवसांपासून येथील गृहप्रकल्पाला तीव्र विरोधहोताना दिसत आहे. रविवारी कामोठे येथील रहिवाशांनी निदर्शने केले. यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आम्ही येते स्केटिंग, फुटबॉल, क्रिकेट यासारखे खेळ खेळतो. आता आम्हाला ते खेळता येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया बच्चे कंपनीने दिली.

गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे दिले आश्वासनखांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर यांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेतली. याबाबत आपण लक्ष घालू, अशी ग्वाही शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्या इमारती बांधण्यात याव्यात, प्रकल्पाला आमचा विरोध नाही हे वारंवार सांगत आहोत. फक्त ही जागा बदलण्यात यावी, ही आमची न्याय्य मागणी आहे.-रंजना सडोलीकर,सचिव, कफसर्वसामान्यांच्या घरांसाठी सिडकोने नक्कीच इमारती बांधाव्यात, याबाबत कोणाचाच विरोध नाही; परंतु रेल्वे स्थानकासमोरील जागा सिडकोने बहु-उद्देशीय कारणाकरिता सोडावी. बदल्यात दुसऱ्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प उभारावा, अशी आम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी केली आहे.- सूरदास गोवारी, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेसखांदा वसाहतीत फक्तबस टर्मिनल्सच व्हावेखांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील प्लॉट क्रमांक ११ वर सिडकोने यापूर्वी नियोजन केल्याप्रमाणे केवळ बस टर्मिनसच व्हावे. येथे प्रधान आवास योजनेअंतर्गत टॉवर उभारू नयेत, त्याकरिता दुसरी जागा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देणार असल्याचे शिर्के म्हणाले, तसेच शासनालाही यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.

नवी मुंबईतूनही होतोय गृहप्रकल्पाला विरोधच्सिडकोच्या माध्यमातून ९५ हजार घरांचा मेगागृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवी मुंबईतील विविध बस व ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकांच्या फोर कोर्ट एरियामध्ये ही घरे बांधली जाणार आहेत. यात तळोजा, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल्स, कळंबोली व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा का समावेश आहे.च्चार टप्प्यांत या घरांची निर्मिती केली जाणार आहे, त्यानुसार सिडकोने कंबर कसली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गेल्या आठवड्यात या नियोजित गृहप्रकल्पांच्या बांधकाम स्थळांना भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, सिडकोच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या गृहप्रकल्पाला विविध स्तरांतून विरोध होत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जात आहे. याच आधारावर नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहून सिडकोच्या या प्रस्तावित गृहनिर्मितीला विरोध दर्शविला आहे.च्त्याचप्रमाणे खांदा कॉलनी आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील नियोजित बस डेपोच्या जागेवर सिडकोने या गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याला विविध स्तरातून तीव्र विरोध होत आहे, त्यामुळे येत्या काळात सिडकोचा ९५ हजार घरांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासमोर अडचणी वाढण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :cidcoसिडको