नवी मुंबई:
अपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्र (एपीसीसी) हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील पहिले आणि एकमेव प्रोटॉन थेरपी केंद्र आहे आणि भारतातील पहिले जेसीआय मान्यताप्राप्त असे कर्करोगाचे रुग्णालय आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. सपना नांगिया आणि अपोलो कर्करोग केंद्राचे ऑन्कोलॉजी सेवाचे संचालक डॉ.अनिल डी'क्रूझ यांनी नवी मुंबईत 'प्रोटॉन कर्करोग थेरपी परिषदेत' रुगांना माहिती आणि प्रबोधन केले ज्यामध्ये मान्यवरांसोबत रुग्णांचे नातेवाईक देखील सामील झाले होते. कौशल्ये आणि उत्कृष्टता हे अपोलोचे स्तंभ आहेत, त्यानुसार केंद्रित आणि प्रशिक्षित कर्करोग व्यवस्थापन टीमच्या मदतीने प्रोटॉन बीम थेरपी कर्करोगावर उपचार करण्यासाठी कटिबद्ध आहे.
प्रोटॉन थेरपी ही एक रेडिएशन थेरपी आहे जी प्रोटॉन नावाच्या लहान कणांचा वापर कर्करोगाच्या पेशींसाठी उत्कृष्ट मारक म्हणून करते. प्रोटॉन त्यांची ऊर्जा प्रदान करतात परंतु फोटॉन थेरपीमध्ये निरोगी ऊतींचे नुकसान होते, तसे प्रोटॉन थेरपीमध्ये होत नाही. त्यामुळे अनेक सामान्य निरोगी पेशींवर परिणाम न करता रेडिएशनचा उच्च डोस ट्यूमरकडे केंद्रित केला जाऊ शकतो. मेंदू, डोके आणि मान, केंद्रीय मज्जासंस्था, फुफ्फुस, प्रोस्टेट (मूत्रशयाची ग्रंथी) आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (आतड्यांसंबंधीच्या) प्रणालीच्या ट्यूमरसह अनेक प्रकारच्या ट्यूमरवर प्रोटॉन थेरपी उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. मुलांमध्ये सॉलिड ट्यूमरवर उपचार करण्यासाठी प्रोटॉन थेरपी हा बहुधा प्राधान्यक्रमाचा पर्याय असतो कारण प्रोटॉन्सचे नियंत्रण अचूकपणे करता येते.
डॉ.सपना नांगिया, वरिष्ठ सल्लागार, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, अपोलो नवी मुंबई, थेरपी आणि थेरपीच्या वापरावर भाष्य करताना म्हणाल्या, "जरी याविषयी अनेकांना फारशी माहिती नसली तरी कर्करोगावरील उपचाराचा पर्याय म्हणून प्रोटॉन तंत्रज्ञानाच्या प्रगतीची सुरुवात १९४० च्या दशकात झाली, या थेरपीचा विकास होऊन आज प्रोटॉन बीम थेरपी या नावाने ओळखली जाते. प्रोटॉन थेरपी कशी कार्य करते हे समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रोटॉन (ऍक्सलेटर) प्रवेगक, किंवा सायक्लोट्रॉन/सिंक्रोट्रॉन आणि बीम डिलिव्हरी प्रणाली समजून घेणे. अपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्रामध्ये नवीनतम पीबीएस तंत्रज्ञान आहे, जे प्रत्येक ट्यूमरवर अतिशय केंद्रित उपचार प्रदान करण्यास सक्षम करते आणि प्रत्येक ट्यूमरवर प्रोटॉन, स्पॉट-बाय-स्पॉट आणि लेयर-बाय-लेयर अशा पद्धतीने उपचार केले करते. याचा वापर योग्यरित्या केल्यास अनेक प्रकारच्या कर्करोगातून मुक्तता करण्यात यश प्राप्त होते, असे सिद्ध झाले आहे."
डॉ.अनिल डी'क्रूझ, संचालक- ऑन्कोलॉजी कर्करोग केंद्र, अपोलो नवी मुंबई म्हणाले, "कर्करोगाचे जागतिक प्रमाण २०१२ मध्ये १२ दशलक्ष होते, मात्र २०१८ मध्ये १८ दशलक्ष आणि २०२० मध्ये १९.३ दशलक्ष इतक्या झपाट्याने वाढले आहे. भारतातील कर्करोगाच्या नोंदी पाहता इथेही तीच परिस्थिती आहे. भारतातील ५ अशा सर्वात सामान्य कर्करोगावर प्रतिबंध करता येऊ शकतो आणि यांचे निदानही लवकर होते. आमच्याकडे येणाऱ्या रूग्णांना सर्वोत्तम परिणाम देण्यासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चिकित्सकांद्वारे समर्थित पुराव्यांवर आधारित स्टोमा क्लिनिक ट्यूमर बोर्ड सारखी अवयव प्रदान करणारी विशेष सेवा सुरू करून अपोलो कर्करोग केंद्र कर्करोगाच्या सेवेला चालना देत आहे."