नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चासाठी लाखो नागरिक येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणारे मोर्चेकरी नवी मुंबईमध्ये वाहने उभी करणार आहेत. मोर्चात सहभागी होणार असून त्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त रामास्वामी एन. व महापौर सुधाकर सोनावणे यांची भेट घेतली. मुंबईत निघणाºया मोर्चासाठी राज्यातून लाखो नागरिक येणार आहेत. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातून येणारे मोर्चेकरी त्यांची वाहने खारघर, बेलापूर, नेरूळ, सीवूड, जुईनगर, सानपाडा व वाशी परिसरामध्ये उभी करणार आहेत. येथून ट्रेनने मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहेत. मोर्चेक-यांना त्रास होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, फिरते शौचालय व इतर सुविधा देण्यात याव्यात, रोडवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.महापौरांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, युवक काँगे्रसचे अध्यक्ष सूरज पाटील, माजी महापौर सागर नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा मोर्चासाठी आवश्यक सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:21 AM