नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाने अखेर ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून, महापालिकेची पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर हद्द निश्चितीसंदर्भातील आदेश काढलेत. या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून त्या संदर्भातील हरकती व सूचना एका महिन्याच्या आत शासनाने मागविल्या आहेत.
यासंदर्भात भाजप आमदार गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत प्रथम पारसिक डोंगरातून एक भोगदा काढून या 14 गावांना जोडणारा एक रस्ता तयार करावा. यासोबतच या 14 गावांच्या विकासासाठी 500 कोटींची तरतूद करून ही 14 गावे महापालिकेत समाविष्ट करावीत अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईकांनी केलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देखील असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नाईकांनी व्यक्त केले.