छटपूजेदरम्यान महापालिकेची स्वच्छतेविषयी जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:45 AM2018-11-15T04:45:52+5:302018-11-15T04:46:23+5:30
तलाव परिसराची स्वच्छता : प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन; कचरा वर्गीकरणाचे दिले धडे
नवी मुंबई : महानगरपालिकेने प्रत्येक सण व उत्सवादरम्यान स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यास सुरवात केली आहे. गणपती, नवरात्र, दिवाळीनंतर छटपूजेदरम्यानही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. तलाव परिसराची स्वच्छता करून नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले व प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.
लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेला गती देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सूचनांप्रमाणे स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. सागरविहार वाशी येथेही स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लबच्या सदस्यांनी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व कचºयाचे निर्माण होतो त्याच ठिकाणी वर्गीकरण करणे त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो योग्य ठिकाणी टाकणे या विषयी जनजागृती केली. यावेळी माजी नगरसेवक संपत शेवाळे सहभागी झाले होते. स्वच्छ सर्वेक्षण २0१९ च्या अनुषंगाने नागरिकांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घ्यावा व दैनंदिन जीवनातून प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करावा याविषयी आवाहन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. या मोहिमेमध्ये स्वच्छता अधिकारी सुधीर पोटफोडे, स्वच्छता निरीक्षक कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
छटपूजेचे औचित्य साधून वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भे विभाग कार्यक्षेत्रामधील खाडी किनारे, तलाव व परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये उपस्थितांना कचºयाचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणाºया ठिकाणीच वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे, प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा याबाबत जनजागृती करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सदर मोहिमेमध्ये वाशी विभागामधील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक व नागरिक उपस्थित होते.