महानगरपालिकेची कॅन्सरविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:23 AM2017-08-04T02:23:37+5:302017-08-04T02:23:37+5:30

गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईकरांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे.

 Public awareness of cancer of the corporation | महानगरपालिकेची कॅन्सरविषयी जनजागृती

महानगरपालिकेची कॅन्सरविषयी जनजागृती

Next

नवी मुंबई : गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईकरांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी ११ आॅगस्ट रोजी या शिबिराची सांगता होणार आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक-सेविका यांच्याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी झालेल्या शिबिरांतर्गत कॅन्सरबाबत माहिती व उपचारविषयक या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिलेल्या माहितीनुसार या शिबिरांतर्गत विविध प्रकारच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करून संशयित रु ग्णांची तपासणीही केली जाणार आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीचे संचालक तथा नामवंत व्याख्याते डॉ. अमोल वानखेडे यांनी उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाºयांशी संवाद साधत कॅन्सर या आजाराविषयी सखोल माहिती दिली, तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आजाराविषयक शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, समाजविकास विभागाच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, इंडियन कॅन्सर सोसायटीचे संचालक डॉ. अमोल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Public awareness of cancer of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.