शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल

By नामदेव मोरे | Updated: July 8, 2024 17:49 IST

रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी : प्रवाशांना बेस्टसह एनएमएमटीचा आधार: हजारो प्रवाशांची अर्ध्यातूनच घरवापसी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे बेस्ट व एनएमएमटी बस थांब्यावरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक सुरळीत होती. परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी सेवा सकाळी बंद करण्यात आली होती. यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकलसुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जावून एसटी, बेस्ट व एनएमएमटी बसेसचा आधार घेतला. सर्व बसेसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईतील सर्व मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे बसेस वेळेत पोहचत नव्हत्या. अनेक प्रवाशांनी अर्ध्या रस्त्यामधूनच घरी जाणे पसंत केले.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ३७० बसेस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबीवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बसेस पाठविण्याचे नियोजन केले होते. पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बसेस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पाेहचते. परंतु सोमवारी एक ते दिड तास उशीरा बसेस पोहचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहचलो पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले. - चंद्रकांत दळवी, विरारवाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. यामुळे कार्यालयात पोहचता आले नाही. - सुधाकर माने, नेरूळकल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती. - विजय देशमुख,कल्याणएनएनएमटीच्या ३७० बसेस विविध मार्गांवर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बसेस वेळेवर पोहचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. - योगेश कडूसकर, व्यवस्थापक एनएमएमटी

टॅग्स :Rainपाऊस