पनवेल : सिडको महामंडळाच्या अन्यायकारक 'नैना' प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पनवेल, पेण आणि उरण तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी निघणाऱ्या जण आक्रोश रॅलीला दि.2 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावातून ही रॅली सुरु झाली आहे. दररोज 25 गावांना यावेळी भेट देण्यात येणार आहे.
गावठाण विस्तार हक्क समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने हि रॅली काढण्यात आली आहे.पहिल्या दिवशीच या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.शेकडो तरुणांनी या रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी नवी मुंबई 95 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश ठाकुर,जी आर पाटील,सुभाष भोपी आदींसह नैना प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.दि.6 डिसेंबर रोजी नैना तुरमाळे गावात प्रकल्प रद्द करण्याच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी हि रॅली काढण्यात आली असल्याचे ढवळे यांनी यावेळी सांगितले.नैना विरोधात प्रचंड जनआक्रोश आहे.मात्र सरकार हा प्रकल्प स्थानकांवर लादत आहे.स्थानिकांची फसवणूक करणारा हा प्रकल्प आम्हाला नको अशीच भावना प्रकल्पग्रस्तांची आहे त्यामुळे हा प्रकल्प आम्हाला नको असे ढवळे यांनी सांगितले.गावोगावी भेटी दरम्यान ग्रामस्थ उस्फुर्तपणे आमच्या रॅलीचे स्वागत करत असल्याचे देखील सांगितले.
सिडको नव्हे हि तर ईस्ट इंडिया कंपनी - पळस्पे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचे आश्वासन सिडकोने यावेळी उपोषणकर्त्यांना दिले होते.मात्र तीन महिने उलटूनही सिडकोने कोणतीही कारवाई केली नसल्याने सिडको ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा आरोप ऍडव्होकेट सुरेश ठाकुर यांनी केला.