"वाशी बेट काल आणि आज' प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन
By नारायण जाधव | Published: October 17, 2023 11:48 AM2023-10-17T11:48:46+5:302023-10-17T11:48:53+5:30
साहित्यिक मोहन भोईर लिखित वाशी बेट काल आणि आज पुस्तकाचे कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन
नवी मुंबई - वाशी बेट काल आणि आज या सुप्रसिद्ध लेखक ,साहित्यिक, कवी आणि नाटककार मोहन भोईर लिखित पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते रविवारी वाशीतील कन्नड सभागृहात करण्यात आले. यावेळी कवयित्री दमयंती भोईर , कवी मुकुंद महाले, मनोकामना सोसायटीचे चेअरमन महादेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईतील साहित्यिक मोहन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सदर वाशी बेट काल आणि आज या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहन भोईर हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वअसून वाशी गावातील ज्वलंत परिस्थितीवर आधारित वाशी बेट काल आणी आज हे अतिशय देखणे पुस्तक लिहले असून ते सर्वाना आवडेल सुजाण आणि सुसंस्कृत माणूस घडण्यासाठी वाचणं महत्त्वाचे आहे, मोहन भोईर यांनी जाणीव प्रकाशनाच्या वतीने दर्जेदार आणि उत्तम साहित्य निर्मिती करत वाचणं संस्कृती जपली असल्याचे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.
आपल्या मनोगतात लेखक मोहन भोईर यांनी वाशी बेट काल आणी आज या पुस्तकाच्या माध्यमातून आगरी कोळी जीवनमान, लोककला विविध सण उत्सव, आदर्श लग्न रीतीरिवाज, नृत्य संस्कृती आदींची माहिती एका पिढीपासून दुसर्या पिढीला माहीत व्हावी यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.