उरण उपजिल्हा रुग्णालय, मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 10:16 PM2022-12-17T22:16:34+5:302022-12-17T22:17:17+5:30
मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.
मागील सुमारे १०-१२ वर्षांपासून उरण येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्याच्या कामाची सुरुवात झाली नाही.त्याचबरोबर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचेही बांधकाम हे अंशदान योजतंर्गत मंजूर आहे.बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे काम वाढीव निधीअभावी बंद पडले आहे.
या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. आमदार महेश बालदी यांच्या मागणीची दखल घेऊन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी खांदा कॉलनी येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना या दोन्ही कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतानाच या इमारतींच्या बांधकामासाठी कोणतीही प्रकारे निधी कमी पडू देणार नसल्याचेही आश्वासन दिले.
या बैठीकीसाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, उप विभागीय अधिकारी नरेश पवार, मिलिंद कदम, नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर, मोरा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, उरण ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. एम. काळेल, शल्य चिकित्सक डॉ. रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरी, नितीन वरकुटे आदी अधिकारी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"