शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

माथेरानची राणी लवकरच रुळावर!

By admin | Published: January 12, 2017 6:08 AM

पर्यटकांचे आकर्षण आणि माथेरानची जीवनवाहिनी असलेली माथेरानची मिनीट्रेन सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने

अजय कदम / माथेरानपर्यटकांचे आकर्षण आणि माथेरानची जीवनवाहिनी असलेली माथेरानची मिनीट्रेन सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, यासाठी आवश्यक दुरु स्ती आणि उपाययोजनांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६.८ कोटींचा प्रकल्प निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. मे २०१६ मध्ये लागोपाठ दोन वेळा माथेरान मिनीट्रेनचे डब्बे रुळावरून घसरल्याने नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा आणि अमन लॉज ते माथेरान शटल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. यामुळे माथेरानच्या पर्यटन आणि जनजीवनावर याचा विपरित परिणाम झाला आहे. यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्र्यांना भेटून ही सेवा पूर्ववत करण्याची विनंती केली होती. मात्र, सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय ही सेवा सुरू करणे शक्य नसल्याची ठाम भूमिका रेल्वे प्रशासनाची होती. आता यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना योजना निश्चित केल्या असून, त्यासाठी आवश्यक निधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला असून, राज्य शासनही यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मिनीट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने सुरक्षिततेचे उपाय म्हणून ५६५० मीटर लांबीचे संरक्षक कठडे उभारण्यात येणार आहेत. १५०० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे, तर ५०० मीटर लांबीची दगडी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. याशिवाय सर्व डब्बे आणि इंजिन एअर ब्रेक प्रणालीने परिपूर्ण करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने काम सुरू आहे. शटल सेवा लवकरच  या मार्गावरील रेल्वे रूळ सुरक्षित करण्याचे काम सुरू झाले आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकर सुरू व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, अमन लॉज ते माथेरान दरम्यान तीन किलोमीटर अंतराची शटल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.  या दृष्टीने रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वे मार्ग सुरळीत होताच ही चाचणी पूर्ण करण्यात येईल. सध्या आमच्याकडे एअर ब्रेक प्रणालीसाठी योग्य ६०० अश्वशक्तीचे एक इंजिन आणि आठ डब्बे आहेत. पहिल्या टप्प्यात अमन लॉज ते माथेरान शटल सेवेसाठी याचा वापर केला जाईल. मंगळवारी रेल्वेचे विभागीय अभियंता आणि सहायक अभियंता यांनीही नेरळ येथे येऊन लोकोशेडला भेट दिल्याने माथेरान मिनीट्रेन लवकर सुरू होण्याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत.