नवी मुंबई : तुर्भे-सानपाडा या महापालिका कार्यक्षेत्रामधील महत्त्वाच्या विभागाला समस्यांचा विळखा पडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या बाजार समितीभोवती कचºयाचे ढिगारे साचले आहेत. तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नही गंभीर झाला आहे. फेरीवाल्यांसह पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सानपाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या भुयारी मार्गाजवळ वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली असून, येणाºया निवडणुकीमध्ये हे प्रश्न उमेदवारांचीही डोकेदुखी वाढविणार आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीनिमित्त शहरातील प्रश्नांवर नागरिकही आवाज उठवू लागले आहेत. तुर्भे विभाग कार्यालय परिसरामधील समस्याही वाढू लागल्या आहेत. याच परिसरामध्ये महापालिकेचे डम्पिंग ग्राउंंड आहे. कचरा टाकण्यासाठीची क्षमता संपली आहे. कचरा टाकण्यासाठी नवीन सेल तयार करण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तुर्भे स्टोअर्स परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नवीन सेललाही रहिवाशांचा विरोध आहे. आतापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावणारी महापालिका अशी नवी मुंबईची ओळख होती. परंतु आता कचºयाची विल्हेवाट कोठे लावायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती आहे. परंतु बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटच्या मागील बाजूच्या रोडवर टाकलेला कचरा उचलला जात नाही. कचरा कोणी उचलायचा? यावरून बाजार समिती व महापालिकेमध्ये मतभेद आहेत. दोन्ही आस्थापनांच्या वादामध्ये येथील कचरा सात ते आठ दिवस उचलला जात नाही. यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अन्नपूर्णा चौकातून माथाडी भवनकडे जाणाºया सर्व्हिस रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सर्व्हिस रोडची जबाबदारी महापालिकेची की एपीएमसीची यावरूनही मतभेद आहेत. यामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नाही. यापूर्वी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावरही फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. परंतु यानंतरही प्रशासनाने हा परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी ठोस कार्यवाही केलेली नाही. तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याची मागणी रहिवासी अनेक वर्षांपासून करीत आहेत. पण अद्याप तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. येथे रस्ता ओलांडताना अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. रहिवाशांनी उड्डाणपुलासाठी आंदोलनही केले आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. निवडणुकीमध्येही हा विषय प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रामधील इंदिरानगर, गणपतीपाडा या झोपडपट्टी परिसरामधील समस्याही गंभीर होत चालल्या आहेत. महापालिकेच्या विकासाच्या योजना अद्याप या परिसरामध्ये पोहोचलेल्या नाहीत. आमच्यापर्यंत विकासाच्या योजना कधी पोहोचणार, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.बोनसरीवासीयांना वाली नाहीतुर्भे व नेरूळ विभाग कार्यालयाच्या हद्दीवर बोनसरी झोपडपट्टी आहे. तुर्भे विभागातील प्रभाग ७३ मध्ये हा परिसर येतो. परंतु नागरिक समस्या सोडविण्यासाठी गेल्यानंतर तुर्भेवाले नेरूळकडे व नेरूळवाले तुर्भेकडे जबाबदारी झटकत आहेत.तुर्भेमधील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने स्थायी समितीमध्ये बोनसरीमधील नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. यामुळे पुढील पावसाळ्यात पुन्हा वसाहतीमध्ये पाणी शिरणार आहे.विस्तारित भुयारी मार्ग हवामहामार्गाकडून सानपाड्याकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्ग तयार केला आहे. परंतु सद्य:स्थितीमध्ये भुयारी मार्ग अपुरा पडत असून येथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. या ठिकाणी अजून एक भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.तुर्भे विभाग कार्यालय परिसरातील समस्याक्षमता संपल्यानंतरही डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकला जात आहेकचरा टाकण्यासाठी नवीन सेल करण्याची कार्यवाही धिम्या गतीनेमहापालिकेच्या नवीन सेललाही रहिवाशांचा विरोधरेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल नसल्याने अपघात व वाहतूककोंडीत वाढअन्नपूर्ण चौक ते माथाडी भवनदरम्यान सर्व्हिस रोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमणमॅफ्को मार्केट परिसरामध्ये पदपथावर अतिक्रमणअन्नपूर्णा चौक ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या रोडवर अनधिकृतपणे कारची पार्किंगतुर्भे स्मशानभूमीसमोरील सर्व्हिस रोडचाही पार्किंगसाठी वापरभाजी व फळ मार्केटच्या मागील बाजूला सर्व्हिस रोडवर कचºयाचे ढीगसानपाडा रेल्वे स्टेशनसमोर रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे वाहतूककोंडीसानपाडाकडे जाणाºया भुयारी मार्गाजवळ वारंवार वाहतूककोंडीतुर्भे, इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी उद्यान, मैदान नाही
तुर्भेत कचऱ्यासह वाहतुकीचा प्रश्न गंभीर; एपीएमसी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:28 AM