शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात पाम बीचचा राडारोडा

By नारायण जाधव | Published: May 07, 2024 6:28 PM

अभियांत्रिकी विभागाच्या देखरेखीत ठेकेदाराचा प्रताप

नवी मुंबई : पाम बीच रस्त्यावर नेरूळ येथे विकसित केलेल्या ज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात नवी मुंबई महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांकडून राडारोडा टाकण्यात येत आहे. यामुळे या परिसराचे सौंदर्य बिघडत चालल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाम रस्त्याच्या डागडुजीतून निर्माण होणारा डांबरी राडारोडा महापालिकेच्या अभियांत्रिकी खात्याच्या देखरेखीखाली खालीच टाकण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अभियानात पाम बीच रस्त्याला लागून नेरूळ येथे १३७ एकर भूखंडावर ‘ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’ विकसित केले आहे. यात ६४ एकरांवर होल्डिंग पाँड, ८ एकरांवर छोटा नैसर्गिक तलाव, १५ एकरांवर वॉक आणि ३५ एकर भूखंडावर देशातील सर्वांत मोठे मियावाकी जंगल उभे केले आहे. महापालिकेने नुकतेच येथील होल्डिंग पाँडमध्ये सांडपाणी जाऊ नये यासाठी २ एमएलडी क्षमतेचे मलउदंचन केंद्र उभारून त्याद्वारे सांडपाणी खेचून ते सेक्टर ५० मधील अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्राकडे वळविले आहे. 

याबाबत कौतुक होत असतानाच पाम बीच रस्त्याची डागडुजी करणाऱ्या ठेकेदाराने आता याच रस्त्याचा राडारोडा महापालिकेच्या संबंधित अभियंत्यांच्या देखरेखीखाली या परिसरात टाकणे सुरू केले आहे. हे करताना काही तो दिसू नये, यासाठी हिरवी नेट बसविली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

राडारोडा टाकण्यामागे ठेकेदारीचे राजकारणज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात जो राडारोडा टाकण्यात येत आहे, तो जाणीवपूर्वक टाकण्यात येत असून यामागे संबंधित ठेकेदार आणि महापालिका अभियांत्रिकी खात्याचे ठेकेदारी आणि टक्केवारीचे राजकारण असल्याचा आरोप होत आहे. आता पाम रस्त्याच्या डागडुजी करणाऱ्या ठेकेदारासह अन्य विकासकामे करणारे ठेकेदार हा राडारोडा टाकत आहेत. याबाबत कुणी तक्रार केल्यास तो काढण्यासाठी पुन्हा नवा ठेकेदार नेमण्याचे टक्केवारी आणि ठेकेदारीचे राजकारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

जबाबदारी निश्चित करून कारवाई कराज्वेल्स ऑफ नवी मुंबई परिसरात पाच बीच रस्त्याचा राडारोडा ज्या ठेकेदाराकडून टाकण्यात येत आहे, त्याच्यासह या कामावर देखरेख ठेवणारे महापालिकेचे संबंधित कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. याबाबत आयुक्त कैलास शिंदे हे संबंधित ठेकेदारासह आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात की कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई