राहुल गांधीच्या विरोधात पनवेलमध्ये 'जोडे मारो' आंदोलन
By वैभव गायकर | Published: November 18, 2022 06:03 PM2022-11-18T18:03:29+5:302022-11-18T18:03:55+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधींवर होतेय टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महाराष्ट्रात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान केल्याच्या प्रकरणावरून दि.18 रोजी पनवेलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौकात राहुल गांधीविरोधात जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले.
महानगरप्रमुख माजी नगरसेवक ॲड प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रथमेश सोमण यांच्यासह खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे यांच्यासह महानगरातील इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला व जोडे मारून त्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला या समयी तहसीलदार पनवेल यांचे कडे अधिकृत निवेदन देऊन काँग्रेसची महाराष्ट्रात सुरू असलेली भारत जोडो यात्रा लवकरात लवकर थांबावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली.