शिवकालीन थाटाने रंगला रायगड महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 02:22 AM2016-01-22T02:22:10+5:302016-01-22T02:22:10+5:30
जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट
महाड : जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट गुरु वारी पाहायला मिळाला. राजदरबारात शिवकालीन पेहरावात सादर करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी गडावर शिवकालीन थाटात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, विविध लोककलांचे दर्शनही घडले.
गडावर गुरु वारी संपन्न झालेल्या या सोहळ्याला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गडावरील सर्व वास्तू फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या होत्या. गडाच्या पायथ्याशी पाचाड गावात जिजामाता वाड्यालगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या शिवसृष्टी शिवकालीन जीवनशैली साकारण्यात आली असून गडावरील नगारखाना, मेघडंबरी आदींसह थोर संतांचे भव्य पुतळे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. शिवसृष्टीमुळे येथे इ्तिहास जाग झाला आहे.
शिवकाळातील शस्त्र, तलबारी, ढाल, दांडपट्टा आदि येथे पहाण्यासाठी लावली आहेत. ही शिवसृष्टी पर्यटकांना नककीच भरळ घालेल, यात शंका नाही. हुबेहुब गाव, राजवाडा येथे साकारला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच ठिकठिकाणी आरोग्यपथके तैनात होती.
(प्रतिनिधी)