शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

कोकण रेल्वेची परिपूर्ण सुसज्जता : पावसाळ्यात नऊ स्थानकांत रेल्वे मेंटेनन्स वाहने, नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा

By नारायण जाधव | Published: June 20, 2024 6:19 PM

सहा ठिकाणी वैद्यकीय पथके अन् ६७२ जवान घालणार मार्गावर २४ तास गस्त...

नवी मुंबई : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेने पूर्ण तयारी केली असून सर्व यंत्रणा ठिकठिकाणी तैनात केल्या आहेत. प्रशासनही संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या सुरळीत धावतील, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यात गस्तीसाठी ६७२ जवान, ९ स्थानकांत रेल्वे मेन्टेनन्स वाहन, वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेन आणि प्रमुख नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणा बसविली असल्याची माहिती गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरिश करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशी आहे मान्सून पेट्रोलिंगपावसाळ्यात रेल्वे मार्गावर गस्त घालण्यासाठी ६७२ जवान तैनात केले असून असुरक्षित ठिकाणी ते चोवीस तास गस्त घालणार आहेत. तसेच या भागात रेल्वेचे वेगावरील निर्बंध लादले आहेत. ९ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल ठेवले आहे. त्यामुळे आणीबाणीत ते मदतीस धावून जाईल. त्यात वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी स्थानकांचा समावेश आहे तर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे त्वरित आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन्स उभ्या केल्या आहेत.

अपघात झाल्यावर १५ मिनिटांत मदतीस ट्रेनपावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठे धुके असल्याने दृश्यमानता कमी होते. त्यामुळे लोको पायलटना ट्रेनचा वेग ४० किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्याने सुसज्ज स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन ठेवल्या आहेत. १५ मिनिटांत येण्यासाठी वेर्णा येथे अपघात निवारण ट्रेनदेखील सज्ज आहे.

रूळांवर १०० मिमीपेक्षा जास्त पाणी साचल्यास गाड्या राहणार बंदट्रॅकवरील पाण्याची पातळी १०० मिमीपेक्षा जास्त असेल अशा परिस्थितीत, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करून, पाणी कमी होईपर्यंत रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. नियंत्रण कार्यालय/स्थानकांशी आपत्कालीन संप्रेषणासाठी मोबाइल फोनसह सुसज्ज सुरक्षा कर्मचारी ठेवले असून लोको पायलट आणि रक्षकांना वॉकी-टॉकी सेट दिले जाणार आहेत.

नऊ स्थानकांवर स्वयं-रेकॉर्डिंग पर्जन्यमापकइमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स मार्गावर अंदाजे प्रत्येक १ किमी अंतरावर स्थापित केले जाणार असून जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत गस्तीचे कर्मचारी, वॉचमन, लोको पायलट गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचारी यांच्यात तत्काळ संपर्क साधता येईल. पावसाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी नऊ स्थानकांवर (माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी) स्वयं-रेकॉर्डिंग पर्जन्यमापक स्थापित केले आहेत.

या नद्यांवर पुराचा इशारा देणारी यंत्रणाकाली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), साीवित्री नदी (वीर आणि सापे वामणेदरम्यान) आणि वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठेदरम्यान) या तीन पुलांवर पूर चेतावनी यंत्रणा बसवल्यामुळे पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क केले जाईल.

चार ठिकाणी ॲनिमोमीटरवाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडोवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) या चार ठिकाणी ॲनिमोमीटर स्थापित केले आहेत.

चोवीस तास नियंत्रण कक्षबेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात सुरक्षित ट्रेनचे संचालन सुनिश्चित करण्यासाठी २४/७ कार्यरत राहतील. 

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबईKonkan Railwayकोकण रेल्वे