तुर्भे नाका येथील रेल्वे पादचारी पूल : प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:33 AM2018-02-12T01:33:32+5:302018-02-12T01:33:42+5:30
तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबई : तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
तुर्भे नाका येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पादचा-यांकडून रस्ता ओलांडण्याच्या प्रकारात अपघात घडत होते. यामुळे त्या ठिकाणी पादचारी पूल बांधून दुभाजकावर लोखंडी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावरील अपघात थांबले असले तरीही त्या ठिकाणी रेल्वे रुळावर मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे. जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रेल्वे रुळावरही पुलाची आवश्यकता आहे. त्याकरिता खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळवली. जानेवारीमध्ये कार्यादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार होती; परंतु ठरवलेली तारीख सातत्याने पुढे ढकलली जात आहे. यामुळे अद्यापपर्यंत प्रत्यक्षात पादचारी पूल बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे तिथे अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने रेल्वे रुळाच्या दुतर्फा फेरीवाले बसतात. यासाठी काहींनी रुळाभोवती बांधलेली भिंत पाडून पाऊलवाट तयार केलेली आहे. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पादचाºयांची ये-जा होत असल्याने बेसावध अवस्थेत त्यांना रेल्वेची धडक लागून अपघात घडत आहेत. अशाच प्रकारातून रविवारी एका व्यक्तीला रेल्वेची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सातत्याने घडणाºया अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी लवकरात लवकर पादचारी पूल उभारला जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या पादचारी पुलासाठी पालिका निधी देणार असून, पुलाचे बांधकाम रेल्वेमार्फत केले जाणार आहे. त्यानुसार पालिका व रेल्वे अधिकाºयांनी प्रत्यक्षात ठिकाणाची पाहणीदेखील केलेली आहे.
या वेळी ज्या ठिकाणी पुलाचा पिलर ज्या ठिकाणी उभारला जाणार होता, त्या ठिकाणी भूमिगत गॅसवाहिनी असल्याचे समोर आले. यामुळे पिलर उभारण्यासाठी अधिकाºयांना नव्या जागेचा शोध घेण्यास अधिक कालावधी लागत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, या कामासंदर्भात दोन्ही प्रशासनाच्या अधिकाºयांकडे चौकशी केल्यास एक-दुसºयावर टोलवा टोलवी होत असल्याचा आरोप शाखाप्रमुख महेश कोटीवाले यांनी केला आहे. तर केवळ श्रेय लाटण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींकडून पालिका अधिकाºयांना हाताशी धरून कामात दिरंगाई केली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेला पादचारी पुलाचे दुसरे टोल रेल्वे रुळाच्या दुसºया बाजूला घेणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे तसे झाले नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी पूल वापरणाºया पादचाºयांना जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रूळ ओलांडावा लागत आहे. त्यामुळे घडणाºया दुर्घटनांना नियोजनाचा अभाव हादेखील कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.