आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला रेल्वे पोलिसांचे अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:00 AM2018-06-12T05:00:30+5:302018-06-12T05:00:30+5:30
खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे.
नवी मुंबई - खोट्या सह्या घेवून जमिनीच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीत नेरुळच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्येच्या घटनेला महिना होवून शिवाय सबळ पुरावे देवूनही रेल्वे पोलीस संबंधितावर कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या बहिणीने केला आहे. यामुळे मयत भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वृद्धापकाळात पोलिसांविरोधात लढा उभारला आहे.
आनंद भिलारे (५०) असे मयत व्यक्तीचे नाव असून, नात्यातील व्यक्तीनेच त्यांची फसवणूक केली आहे. काही कारणास्तव भिलारे यांना पैशाची गरज होती. यावेळी सदर नातेवाईकाने त्यांच्या सह्यांचा गैरवापर करून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर भिलारे यांनी आपली जमीन परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी अमित इथापे या नातेवाइकाच्या नावे चिठ्ठी लिहून ५ मे रोजी नेरुळ रेल्वेस्थानकालगत रुळावर आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी व इथापे सोबत मेसेजवर झालेल्या चर्चेचे पुरावे रेल्वे पोलिसांकडे सोपवले. त्यानुसार आनंद भिलारे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºयावर कारवाईची मागणी केली. याकरिता त्यांची वृद्ध बहीण पुष्पा गायकवाड या सातत्याने रेल्वे पोलिसांकडे प्रयत्न करत आहेत. मात्र वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक सुरेश पाटील यांनी ‘तपास सुरू आहे’ एवढेच उत्तर देवून आजवर निराशा केल्याचाही त्यांचा आरोप आहे.
भिलारे यांनी आत्महत्येपूर्वी दिलेले पुरावे पुरेसे असतानाही नेमके कोणत्या कारणावरून पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी धाव घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुष्पा गायकवाड म्हणाल्या.