शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘मेंटल’मधील रेल्वे स्टेशन लागले मार्गी

By admin | Published: May 11, 2016 1:36 AM

ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली

ठाणे : ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली. हा प्रकल्प संयुक्त भागीदारीत पूर्ण करण्यावरही सहमती झाली. आठवडाभरात प्रकल्प अहवाल तयार करून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. कोपरी पुलाजवळ रेल्वे मार्गावर एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येणाऱ्या पुलाबाबतही सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. हे काम पावसाळ््यानंतर दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे. खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घऊन या प्रकल्पासाठी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याला समन्वयाचे काम देण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रभू यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता यांची नियुक्ती केली. विचारे यांनी तीन दिवस सातत्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाविषयी चर्चा केली. त्या पाशर््वभूमीवर ही बैठक पार पडली.विस्तारित रेल्वे स्टेशनच्या सीमांकनाबाबत चर्चा झाली. ठाणे महापालिकेने या विस्तारित रेल्वे स्टेशनसाठी जे सीमांकन प्रस्तावित केले होते त्याला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून लवकरच हा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्यावतीने मे. बालाजी रेल रोड सिस्टम लि. ही सल्लागार संस्था करत आहे. तो आठवड्यात तयार करण्याची सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या. अहवाल तयार झाल्यानंतर पुढील आठवड्यात सुरेश प्रभू यांच्यासमवेतच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल, नितीन पवार, उप अभियंता राजकुमार पवार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)