नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2015 10:48 PM2015-07-28T22:48:38+5:302015-07-28T22:48:38+5:30

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मंगळवारी शहराला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशीच्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुसळधार पावसाने शहरातील विविध ठिकाणी

Rain with thunderstorms in Navi Mumbai | नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस

नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस

Next

नवी मुंबई : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मंगळवारी शहराला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशीच्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुसळधार पावसाने शहरातील विविध ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याने झोपडपट्टीवासीयांचे अतोनात हाल झाले.
मंगळवारी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नवी मुंबईकरांना झोडपून काढणाऱ्या पावसाबरोबरच जोराचे वारे देखील वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडत होत्या. त्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलाकडून त्याठिकाणी जावून पडलेली झाडे हटवली जात होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. घणसोली येथील रिलायन्स कंपनीजवळ, रबाळे येथील सिध्दार्थ नगर, सीबीडी सेक्टर १,४ व ८, आयकर कॉलनी, सानपाडा सेक्टर ३ परिसरातील भाजी मंडईजवळ,ऐरोली सेक्टर ५ पेट्रोल पंपाजवळ, नेरु ळ सेक्टर १३ एस.बी.आय. कॉलनीजवळ अशा नऊ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.
सीबीडीतील रमाबाई आंबेडकर नगर तसेच दुर्गामाता झोपडपट्टी परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा व पावसाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवरही या पावसाचा परिणाम झाल्याने लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Rain with thunderstorms in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.