नवी मुंबई:नवी मुंबई परिसरात पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी सकाळी व्यायामाठी व नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती.
पावसामुळे शहरातील मैदानांचे तळ्यात रूपांतर झाले होते. रोडवरही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सकाळी व्यायासह, नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. मोटारसायकल स्वारांनी उड्डाणपुलाखाली गर्दी केली होती. अनेकांनी बसस्थानकांच्या शेडचा आसरा घेतला होता. जाॅगींग ट्रॅकवर पोहचलेल्या नागरिकांचीही पावसाने अडोसा शोधण्यासाठी धावपळ उडाली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट मध्ये पावसाने खरेदीदार, व्यापारी, वाहतूकदार सर्वांची धांदल उडाली होती. भाजी खरादीवरही पावसामुळे परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"