शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

मोरबे धरणावर जलवर्षाव, नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली!

By नामदेव भोर | Published: July 25, 2024 6:58 PM

दहा तासांत १९७ मि.मी. पाऊस : एक दिवसात ८ टक्के पाणीसाठा वाढला 

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावर गुरुवारी जलवर्षाव झाला. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासांमध्ये तब्बल १९७ मि. मी. पावसाची नोंद झाली. एका दिवसात पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली असून, या वर्षीही धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे.

या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला होता. १ जुलैपर्यंत ५६१ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. धरणात ५४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता; परंतु मागील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला आहे. गुरुवारी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळी सात वाजेपर्यंत धरणात ६६.३८ टक्के धरण भरले होते. 

आतापर्यंत एकूण पाऊस २१२२ मि.मी. एवढा झाला होता. धरणाची पातळी ८०.८६ मीटरपर्यंत वाढली होती. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासांमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी १९७ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणाची पातळी ७१.२४ मीटरवर पोहोचली. एकूण पाऊस २३१९ मि. मी. झाला आहे. धरणाची पातळी ८१.९९ मीटरपर्यंत वाढली आहे.            मोरबे धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढा साठा धरणात आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस पडला तर या वर्षीही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी अजून १ हजार मि. मी. पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. यामुळे ऑगस्टमध्ये धरण भरेल अशी अपेक्षा आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी धरण परिसरातील पाऊस व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मोरबे धरण परिसरातील पाणीसाठ्याचा तपशीलप्रकार - १ जुलै - २५ जुलैदिवसभरातील पाऊस - ५६.२० - १९७एकूण पाऊस - ५६१ - २३१९पाणीपातळी - ७०.१६ - ८१.९९एकूण साठा - ५३.८८ एमसीएम - १३६ एमसीएमपाणीसाठा टक्केवारी - २८.२२ - ७१.२४

२५ दिवसांत वाढला ४३ टक्के पाणीसाठामोरबे धरण परिसरामध्ये जुलैच्या सुरुवातीला फक्त ५४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा होता. आता जवळपास २३० दिवस पुरेल एवढा साठा धरणात उपलब्ध आहे. २५ दिवसांमध्ये तब्बल ४३ टक्के पाणीसाठा वाढला असून तो २८.२२ वरून ७१.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई