पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार; १७१ मिमीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:07 AM2019-08-05T00:07:00+5:302019-08-05T00:07:11+5:30

विमानतळाच्या भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब

Rainfall in Panvel | पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार; १७१ मिमीची नोंद

पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार; १७१ मिमीची नोंद

googlenewsNext

पनवेल : पनवेल शहरासह तालुक्यातील अनेक गावांना शनिवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोरदार फटका बसला. पनवेल शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सकाळीपासून जोर वाढल्याने शहरातील साई नगर परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना विविध घडल्या. विमानतळाच्या भरावामुळे गावांमध्ये पाणी शिरल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

खारघर शहरात तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. यामध्ये सेक्टर ११ मधील रॉयन इंटरनॅशनल शाळेच्या भिंतीवर झाड कोसळले. सुदैवाने सुटी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुसरी घटना शहरातील सेक्टर ८ व १० ला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेमुळे वाहतूक बंद झाली होती.

पनवेल शहरातील साईनगर, ५२ बंगला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने याठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे रस्त्यावर पार्र्किं ग केलेल्या वाहनांमध्ये पाणी शिरले होते. शहरातील कोळीवाडा , भारतनगर, पटेल मोहल्ला, टपाल नाका, उरण नाका रोड याठिकाणांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गाढी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून किनाºयालगत असलेल्या वसाहतीत पाणी शिरले होते. सुकापूरमधील काही रहिवासी संकुलात तीन ते चार फूट पाणी साचले होते. तालुक्यात २४ तासात सरासरी १७१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील अनेक गावे पाण्यात गेली. यात पडघे, तळोजे मजकूर, वावंजे, पळस्पे गणेशवाडी, फरशीपाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाकरिता मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने पनवेल शहरात पाणी तुंबण्याचा प्रकार वाढला असल्याचे माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी सांगितले.
भविष्यात शहराला पुराचा धोका कायम राहणार असल्याने सिडकोने याबाबत सक्षम उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पनवेल शहरालगत करंजाडे गावात जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे अनेक चालकांना वळसा घालुन पनवेल शहरात प्रवेश करावा लागला. आठवडाभरापूर्वी पनवेल शहराला मुसळधार पावसाने झोडपले होते. यांनतर आता पुन्हा एकदा शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले असून जिल्ह्यात २४० सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.

विमातळाच्या भरावाचा फटका पनवेल शहराला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
२०१३ पासून सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने भविष्यात पनवेल शहर पाण्याखाली जाण्याची व्यक्त होत आहे.
हजारो एकर जमिनीवर भराव करण्यात आल्याने पनवेल शहराला वारंवार अशाप्रकारे पुराचा फटका बसत आहे.

पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मोहल्ला, रोडपाली फुडलँड, तळोजा याठिकाणी पाणी साचल्याने रहिवाशांना याठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले. पालिका, सिडको प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य सुरू आहे.
- अमित सानप ( तहसीलदार, पनवेल)

Web Title: Rainfall in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस