पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:05 AM2021-12-04T07:05:00+5:302021-12-04T07:05:07+5:30

पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.

Rains damage crops, vegetables become more expensive, incomes fall, rates likely to rise further | पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

Next

नवी मुंबई : पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० ट्रक, टेम्पोमधून ३ ते साडेतीन हजार टन  भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. पावसामुळे शुक्रवारी ३२५ वाहनांमधून २ हजार टन भाजीपाला आला. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्यामुळे अचानक सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
घाऊक मंडईमध्ये १८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर २० ते ७० रुपये झाले आहेत. फ्लॉवरचे दर १४ ते २४ रुपयांवर 
गेले आहेत.  

भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर 
वस्तू      २ डिसेंबर     ३ डिसेंबर 
भेंडी     १८ ते ५०     २० ते ७० 
दुधी भोपळा    १० ते २०     १८ ते ३० 
फ्लॉवर     १० ते १४     १४ ते २४
गाजर     १५ ते २०     २५ ते ३६
गवार     ४० ते ५०     ५० ते ७०
घेवडा     २० ते ३०     २५ ते ३५
काकडी     ८ ते २४     १५ ते ४०
कारली     १० ते २०     २० ते २६
शेवगा शेंग     १०० ते २००     १४० ते २००
वांगी     १५ ते ३०     १५ ते ४० 

पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे अचानक भाजीपाल्याचे दर वाढले असून पुढील काही दिवस मार्केटमध्ये तेजी कायम राहील. 
- बाबू घाग, भाजीपाला व्यापारी 

Web Title: Rains damage crops, vegetables become more expensive, incomes fall, rates likely to rise further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.