रायगडावर शिवगर्जनेचा जयघोष
By admin | Published: January 22, 2016 02:20 AM2016-01-22T02:20:43+5:302016-01-22T02:20:43+5:30
रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ही शिवसृष्टी २४ जानेवारीपर्र्यंत सर्वांना पाहता येणार आहे.
रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ही शिवसृष्टी २४ जानेवारीपर्र्यंत सर्वांना पाहता येणार आहे. येथे शिवकालीन इतिहासाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. या रायगड महोत्सवाचे उद्घाटन गुरु वारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शिवकालीन इतिहास कथन करणारे कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत. येथे रविवारपर्यंत महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधी स्थळ यांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहीर, वासुदेव, भारु डकर आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार आहेत.
रायगडावर अवतरला शिवशाहीचा थाट
१महाड : जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट गुरु वारी पाहायला मिळाला. राजदरबारात शिवकालीन पेहरावात सादर करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी गडावर शिवकालीन थाटात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, विविध लोककलांचे दर्शनही घडले.
२गडावर गुरु वारी संपन्न झालेल्या या सोहळ्याला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गडावरील सर्व वास्तू फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या होत्या. गडाच्या पायथ्याशी पाचाड गावात जिजामाता वाड्यालगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या शिवसृष्टी शिवकालीन जीवनशैली साकारण्यात आली असून गडावरील नगारखाना, मेघडंबरी आदींसह थोर संतांचे भव्य पुतळे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. शिवसृष्टीमुळे येथे इतिहास जागा झाला आहे.
३शिवकाळातील शस्त्रे, तलवारी, ढाल, दांडपट्टा आदी येथे पाहण्यासाठी लावले आहेत. ही शिवसृष्टी पर्यटकांना नक्कीच भुरळ घालेल, यात शंका नाही. हुबेहूब गाव, राजवाडा येथे साकारला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच ठिकठिकाणी आरोग्यपथके तैनात होती. नातेखिंड ते गडापर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वाहन पार्र्किंगच्या सुविधेमुळे वाहतुकीची कोंडी मात्र झाली नाही.