कर्जत : कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात ४५ गावातील शेती ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यात १५ डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. राजनाला भागातील शेतकºयांना पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी साशंक होते. मात्र, शेतकºयांच्या मागणीचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. १५ डिसेंबरला राजनाला कालव्याच्या मुख्य कालव्यात पाणी सोडले जाणार असून, तशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भरत काजळे यांनी दिली आहे.कर्जत तालुक्यातील शेतकरी राजनाला कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी शेती करतात. मागील काही वर्षे राजनाला कालव्याचे दुरु स्तीचे काम सुरू असून शेतकºयांना अनेक वर्षे शेतीसाठी पाणी सोडले जात नव्हते. मागील वर्षी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले; परंतु ते पूर्ण क्षमतेने नसल्याने सर्व भागात पुरवठा होऊ शकला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याअभावी खराब झाली होती. त्यामुळे यंदा शेतीसाठी पाणी सोडणार असाल, तर ते सर्व ४५ गावांतील शेतीसाठी आणि पूर्ण क्षमतेने सोडले जावे, यासाठी राजनाला भागातील शेतकरी आक्र मक होते. मात्र, कालव्याच्या दुरु स्तीची कामे आजही अपूर्ण असल्याने पाटबंधारे विभाग त्याबाबत निरु त्तर होता. मात्र, शेतकºयांनी आग्रही भूमिकेने राजनालाचे पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.राजनाल्यात पाणी सोडल्याने उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त भागातील शेतीला पाणी पोहोचेलमुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी डावा कालवा, उजवा कालवा, पाली पोटल कालवा येथून ४५ गावांतील किमान २००० हेक्टर जमिनीत पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाला आहे; पण किती शेतकरी भातशेती करण्यासाठी पाणी वापरणार? याचे उत्तर पाटबंधारे खात्याकडे नाही. कालव्यात सोडले जाणारे पाणी शेतीसाठी आवश्यक आहे तेवढे मिळेलच याची खात्री शेतकºयांना नाही आणि पाणी मिळाले नाही तर शेती फुकट जाऊन नुकसान होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे १५ डिसेंबर रोजी पाणी मुख्य कालव्यात सोडल्यानंतर आपल्या जमिनीत कधी येणार यावर शेती करण्याचे नियोजन अवलंबून असणार आहे.१५ डिसेंबर रोजी राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे. मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या गावात २० डिसेंबरपर्यंत पोहोचणार आहे. तर राजनाला कालव्यात पाणी सोडणे १४ एप्रिल २०१९ पासून बंद केले जाणार आहे.- भरत काजळे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग
राजनाला कालव्यात १५ डिसेंबरला पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:49 AM