नवी मुंबई : नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात वाशीत रॅली काढण्यात आली होती. वाशी रेल्वेस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान ही रॅली काढण्यात आली. त्यामध्ये विविध संघटना व संस्थांनी सहभाग घेतला होता.केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या निर्णयाविरोधात काही संघटनांनी आवाज उठवला आहे. त्यानुसार नवी मुंबईतील विविध सामाजिक संघटना तसेच संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वाशीत देखिल रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माहिती अधिकार कार्यकर्ते राजीव मिश्रा, संतोष शेट्टी, मल्लीकार्जुन पुजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या नेतृत्वाखाली वाशी रेल्वेस्थानकापासून ही रॅली सुरु करून शिवाजी महाराज चौकात त्याची सांगता करण्यात आली.यावेळी तोंडावर काळ्या पट्टया बांधून नागरीक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे अनेकांपुढे अडचणी वाढणार असल्याची भिती व्यक्त करत या कायद्याला आपला विरोध दर्शवला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:14 AM