डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमध्ये रॅली
By admin | Published: March 25, 2017 01:38 AM2017-03-25T01:38:17+5:302017-03-25T01:38:17+5:30
धुळे येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमधील डॉक्टरांनी शुक्र वारी निषेध रॅली काढली. पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो डॉक्टर्स रॅलीत सहभागी झाले होते.
पनवेल : धुळे येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमधील डॉक्टरांनी शुक्र वारी निषेध रॅली काढली. पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो डॉक्टर्स रॅलीत सहभागी झाले होते.
डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. अनिल परमार, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. सुभाष सिंग, डॉ. गिरीश गुणे, डॉ. विनय शेलार, डॉ. संदीप आमले, डॉ. आनंद पवळ, डॉ. नीलेश बांठिया यांच्यासह लाइफ लाइन रुग्णालय, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, परमार, गांधी, पेनेसिया, शेलार रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी या वेळी रस्त्यावर उतरले होते.
पनवेल डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत सहभागी डॉक्टरांनी फलकांद्वारे निषेध व्यक्त केला. रॅलीचा शेवट महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आला.
गेल्या आठवड्यात डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील बाजारे यांची भेट घेतली होती. त्या वेळी बाजारे यांनी पनवेलमध्ये अशा प्रकारचा हल्ला होऊ देणार नसल्याची खात्री डॉक्टरांना दिली होती. (प्रतिनिधी)