नवी मुंबई : श्रीरामाच्या जन्माचा महोत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पहाटे काकड आरती झाल्यावर सुमधुर गीत, भजनांनी वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. सकाळपासून मंदिरांमध्ये लागलेल्या रांगा, ठिकठिकाणच्या सामाजिक आणि खासगी संस्थांनी पहाटेपासून आयोजित केलेले कार्यक्रम, पालखी सोहळे यांच्यामुळे चैतन्य निर्माण झाले होते. रामनवमीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.पहाटेपासून काकड आरत्यांनी रामनवमीच्या उत्सवाला सुरु वात झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजता शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा पार पडला. रामनवमीनिमित्ताने ठिकठिकाणी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीच्या साईबाबांनी १९११मध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. अनेक साईमंदिरांतही कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. ‘साईचरित’ ग्रंथांचे पारायणही सुरू आहे. रामनवमीनिमित्त विविध संस्थांकडून, तसेच मंदिरात आठवडाभर सोहळे सुरू राहणार आहेत. काकड आरत्या, रामायणाचे पारायण, श्रीरामलीला उत्सव, प्रवचन, कीर्तन यांचा आनंद भक्तांना घेता येणार आहे. सीबीडी सेक्टर-२मधील अलबेला हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने रामजन्मोत्सव सोहळा साजरा केला. सोहळ्यासाठी परिसरातील असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. येथील महिलांनी मिळून पाळणा सजवून साग्रसंगीत पूजा केली. संपूर्ण मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात हनुमान जयंतीपर्यंत विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. कोपरी गावातील राममंदिर, तसेच हनुमान मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.राम-मारु ती जन्मोत्सव मंडळ, बेलापूर यांच्या वतीने रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या या उत्सवात रामाच्या मूर्तीची विधिपूर्वक पूजा करण्यात आली. सकाळपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बेलापूर गावात गेली १५० वर्षांपासून रामजन्मोत्सव साजरा केला जात आहे. पहाटे ५ वाजता श्रीराम स्तोत्राचे पठण करून त्यानंतर काकड आरती करण्यात आली. त्यानंतर हरिपाठ, कीर्तन आणि रामरायाचा अभिषेक झाला. १२.३९ वाजता रामजन्म झाला. गावातील महिलांनी पाळणा गात मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा केला. गावातील भजन मंडळाच्या वतीने दिवसभर संगीत भजनाचे कार्यक्र म सादर करण्यात आले.बेलापूरमधील रामजन्मोत्सव पाहायला हजारो भाविकांनी गर्दी केली. विज्ञान म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनबध्द आखणी शिस्तबद्ध पद्धतीने रामजन्मोत्सव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता स्वयंसेवक मंदिर परिसरात कार्यरत होते.
शहरात रामजन्मोत्सवाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:53 AM