शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

पोलीस दलातील रणरागिणींचा सत्कार

By admin | Published: August 13, 2015 12:32 AM

नेरूळमधील पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका केली होती. दुसऱ्या राज्यात जाऊन अशाप्रकारे पीडित मुलींची सुटका करण्याचे हे एकमेव

नवी मुंबई : नेरूळमधील पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका केली होती. दुसऱ्या राज्यात जाऊन अशाप्रकारे पीडित मुलींची सुटका करण्याचे हे एकमेव उदाहरण असल्यामुळे ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेमध्ये सत्कार करण्यात आला. राज्यातील विविध भागामधील मुलींना पळवून नेवून आग्रा येथील कुंटणखान्यात ठेवण्यात आले होते. नवी मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम आग्रा येथे गेली आणि २१ मुलींची सुटका केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महापालिकेच्या वतीने या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांनी केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण आणि तितकीच कौतुकास्पद असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन राबविण्यात आले. महापालिकेने केलेल्या सत्कारामुळे पोलीस दलाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मतही व्यक्त केले. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेले सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ मजगे, सहायक निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सचिन हिरे, दीपक डोंब, साहेबराव भोसले, भाऊसाहेब लोंढे, श्रीकांत उबाळे, ए.आर. साळुंखे, मंगेश पाटील, राजू भांगरे, सुवर्णा कांदळकर, अर्चना पाटील व सोनाली गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)सत्कार सभागृहात झाला पाहिजे : विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. नवी मुंबईकरांना या बहादूर पोलिसांचा अभिमान आहे. त्यांचा यथोचित सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला पाहिजे. अभिनंदनाचा विशेष प्रस्ताव मांडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.