रानसई धरणाच्या भिंतीचे प्लॅस्टर ढासळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:48 PM2019-07-18T23:48:28+5:302019-07-18T23:48:36+5:30

उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळू लागले आहे,

The rancheri wall plaister collapsed | रानसई धरणाच्या भिंतीचे प्लॅस्टर ढासळले

रानसई धरणाच्या भिंतीचे प्लॅस्टर ढासळले

Next

उरण : उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळू लागले आहे, त्यामुळे कोकणातील तिवरे धरणाची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती धरण परिसरात ग्रामस्थांना आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रानसई, विंधणे, दिघोडे आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकºयांच्या जमिनी १९७० मध्ये धरणासाठी संपादित करण्यात आल्या.
रानसई अदिवासीवाडी जवळच्या डोंगरकपारीत १९७० ते ८० या कालावधीत ७७ फूट लांबीची (२३६.७६ मीटर) व ४६ फूट खोली (१४ मीटर) असणारी तसेच १५ दरवाजांची संख्या असणाºया पाणलोट क्षेत्रातील धरणाची संरक्षण भिंत उभारण्यात आली, त्यामुळे धरणाच्या पाण्याखाली ३५० एकर क्षेत्राचा समावेश असून दहा एम.सी.एम. १००० कोटी लीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. धरणातील (पाणलोट क्षेत्रातील) पाण्याचा पुरवठा उरण तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस, उरण शहर व तालुक्यातील २५ गावांतील जनतेला एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सध्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळत चालले आहे.
धरणाच्या संरक्षण भिंतीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी रानसई धरण परिसराला भेट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पनवेल-उरणचे वरिष्ठ अभियंता सतीश पवार यांच्याकडे विचारणा केली असता, रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण बंधाºयाचे प्लॅस्टर पावसामुळे ढासळले असून लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर उरणचे उपअभियंता आर.डी. बिरंजे यांंनी, रानसई धरणाच्या संरक्षण बंधाºयाला कोणताही धोका नसल्याचे या वेळी सांगितले.

Web Title: The rancheri wall plaister collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.