शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर रांगा
By admin | Published: June 16, 2017 02:35 AM2017-06-16T02:35:14+5:302017-06-16T02:35:14+5:30
दहावीच्या आॅनलाइन निकालानंतर बुधवारपासून गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठीची प्रक्रिया मंडळाने सुरू केली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळपासून वाशी येथील
- प्राची सोनवणे। लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : दहावीच्या आॅनलाइन निकालानंतर बुधवारपासून गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठीची प्रक्रिया मंडळाने सुरू केली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळपासून वाशी येथील विभागीय मंडळ कार्यालयात रांगा लावल्या होत्या. दोन दिवसांमध्ये ७०२ विद्यार्थ्यांनी आॅफलाइन अर्ज केले आहे. आॅनलाइन प्रक्रियेलाही प्रतिसाद मिळत असून जवळपास दीडशे अर्ज आले आहेत.
गुरुवारपासून गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीकरिता अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी २७३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले दर गुरुवारी ४२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे दिली. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रि येसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी मंडळाने यंदा निकालानंतर लगेच प्रक्रि येला सुरु वात केली. गुणपडताळणीकरिता विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे तर उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीकरिता ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असल्याचेही बोरसे यांनी स्पष्ट केले.आॅनलाइन अर्जदारांचीही संख्या वाढत असून दहावीच्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केलेत, तर बारावीच्या सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेत. विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज सादर करण्यासाठी मंडळात धाव घेतली आहे. दरवर्षी अर्ज भरण्याच्या प्रक्रि येनंतर अनेकदा विद्यार्थी, पालकांना मंडळात फेऱ्या माराव्या लागतात. याकरिता आॅनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायांकित प्रतीकरिता प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे.
छायांकित प्रती, गुणपडताळणीची प्रक्रि या वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागीय मंडळाचे कामकाज जलद गतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांना कोणती अडचण येणार नाही याची पुरेपूर दखल घेतली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांचा त्रास कमी व्हावा, रांगेत उभे राहावे लागू नये तसेच वेळेची बचत करण्यासाठी मुंबई विभागाच्या वतीने आॅनलाइन अर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- डॉ. सुभाष बोरसे,
प्रभारी सहसचिव, शिक्षण मंडळ