पनवेल : खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बलात्कारात गुन्ह्यातील फरारी आरोपीला शुक्रवारी हरिद्वार येथून अटक करण्यात आले असून खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथक प्र्रथम आसाम त्यानंतर आरोपीच्या मूळ गावी उत्तर प्रदेशातील शामली येथे गेले. मात्र आरोपी हरिद्वार येथे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हरिद्वार स्थानक परिसरातून सकाळी ७ च्या सुमारास आरोपीला सापळा रचून अटक केली. उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुशीलकुमार रमेशचंद्र चौहान (४३) हा आरोपी तांत्रिक-मांत्रिक बनून घरात दाखल झाला होता. त्यानंतर तक्रारदारास भूतबाधा झाल्याचे सांगून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठपोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी दिली.
बलात्कारातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:20 AM