रॅपीड अॅक्शन फोर्समधील जवानाची गुंडगिरी, रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 11:13 AM2017-11-30T11:13:02+5:302017-11-30T11:13:15+5:30

खारघरमध्ये असलेल्या तळोडा रैपिड एक्शन फ़ोर्स(शीघ्र कृती दल) च्या जवानानी एका रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील तलोजा मजकुर गावात घडली.

Rapid Action Force ruthlessly rammed into the house and rickshaw driver rammed into the house | रॅपीड अॅक्शन फोर्समधील जवानाची गुंडगिरी, रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण

रॅपीड अॅक्शन फोर्समधील जवानाची गुंडगिरी, रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण

Next

पनवेल- खारघरमध्ये असलेल्या तळोडा रैपिड एक्शन फ़ोर्स(शीघ्र कृती दल) च्या जवानानी एका रिक्षा चालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील तलोजा मजकुर गावात घडली. सुनील पाटील असे  रिक्षा चालकाचे नाव असून त्याला मारहाण करतनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
 

रॅपीड अॅक्शन फोर्समधील जवान व  रिक्षा चालक यांच्यात बुधवार ता.29 रोजी वाद झाला. रिक्षा चालक त्याठिकानहून निघाल्यांनंतर या जवानानी  रिक्षा चालकाचा पाठलाग करीत संध्याकाळी सात साडे सातच्या दरम्यान सुनील पाटील याला मारहाण केली. चार  ते पाच जवानाच्या गटाने ही मारहाण करून रिक्षा चालकाला त्याठिकाणाहून उचलून नेन्यात आलं. या घटनेत  रिक्षा चालक जखमी झाला आहे.      रॅपीड अॅक्शन फोर्समधील जवान व या परीसरात राहणारे ग्रामस्त यांच्यात नेहमीच छोटे मोठे वाद होत असतात. जवान नेहमीच या परीसरात अरेरावी करत असतात असा या परीसरातील नागरीकांचा आरोप आहे. बुधवार ता.29 रोजी तळोजा फेस येथील पनवेल दिवा मार्गावर तळोजा फेस 1 येथे रेल्वे फाटक आहे.या फाटकावर नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. कोंडीमुळे या ठिकाणी वारंवार वाहनचालकानमधे खटके उडत असतात.

बुधवारी या ठिकाणी रिक्षा चालक सुनील पाटील हे आपली रिक्षा घेवून जात असताना त्या ठिकाणाहुन सायकलवर जाणाऱ्या एका सिआरएफ जवानाला त्यांच्या रिक्षाचा धंक्का लागला. या वेळी जवान आणि रिक्षा चालक यांच्यात बाचाबाची होवुन प्रकरण वाढले. काही नागरीकांनी हस्तक्षेप करत हे भांडण थांबवल. मात्र जवानाने थोड्या वेळाणे आपल्या काही सहकाऱ्यां त्या ठिकाणी बोलावुन सहकार्यानसेबत तळोजा मजकुर या गावात घुसुन सुनील पाटील यांना त्यांच्या राहत्या घरात घुसुन त्या रिक्षा चालकाला मारहाण केली .या जवानाना क़ायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या घटनेचीं नोंद तळोजा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून जखमी  रिक्षा चालकावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Web Title: Rapid Action Force ruthlessly rammed into the house and rickshaw driver rammed into the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.