शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

रश्मी नांदेडकर : पडद्याआडचे रक्षक पोलिसांचा खरा कणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:04 IST

नवी मुंबई पोलिसांचा हाच कणा भक्कम राखण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर सध्या निभावत आहेत.

नवी मुंबई : शहरात कोणताही गुन्हा, दुर्घटना घडली की, घटनास्थळी दिसतात ते पोलिस. संकटकाळात आठवतात तेदेखील पोलिस. त्यावरून पोलिस ठाण्यात नेहमी दिसणारे पोलिस किंवा गुन्हे शाखेचे पोलिसच प्रत्येकाच्या तोंडी चर्चेत असतात. मात्र, त्याही पलीकडचे व महत्त्वाचे कामकाज हाताळणारे मात्र नेहमी पडद्याआड राहणारे पोलिस किंचित नागरिकांना माहीत असतील. कुठल्याही चर्चेत न येता, गोपनीय कामकाज करणारी विशेष शाखेची ही यंत्रणा पोलिसांचा मुख्य कणा असतो. नवी मुंबई पोलिसांचा हाच कणा भक्कम राखण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर सध्या निभावत आहेत.

वर्ष २००९च्या बॅचच्या रश्मी नांदेडकर यांनी विदर्भ, नाशिक, भंडारा, नागपूर येथे कामातून स्वतंत्र छाप उमटवल्यानंतर सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना नकोशी वाटणारी विशेष शाखेची जबाबदारी नांदेडकर यांनी मात्र आनंदाने स्वीकारली. शहरात कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सभा, प्रवास होणार असल्यास त्यांच्या सुरक्षेचा पूर्णपणे गोपनीय आढावा याच विशेष शाखेकडून घेतला जातो. 

८५ हजार पासपोर्टसह ७० हजार जणांची चारित्र्य पडताळणीरोजच्या कामासोबतच मागील वर्षभरात विशेष शाखेने सुमारे ८५ हजार नागरिकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन उरकून त्यांच्या विदेशवारीच्या स्वप्नांना पंख दिले आहेत. शिवाय खासगी, सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या जवळपास ७० हजार व्यक्तींची चारित्र्य पडताळणी करून दिली आहे. यावरून त्यांच्या कामाचा व्याप दिसून येतो. सोशल मीडियामुळे उसळणारे वाद, घातपात घडवू पाहणाऱ्या व्यक्तींचे मनसुबे उधळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे उपक्रमही विशेष शाखेमार्फत राबवले जातात. त्यामुळे नेहमी पडद्याआड राहणाऱ्या विशेष शाखेला एकप्रकारे पोलिसांचा कणा समजले जाते.

यावर ठेवतात विशेष लक्षपासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य पडताळणी, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह हालचाली, सागरी सुरक्षा, महत्त्वाची ठिकाणे, विदेशी नागरिक, अशा अनेक पडद्यामागील प्रमुख जबाबदाऱ्या विशेष शाखेवर असतात. हे कामकाज पूर्णपणे गोपनीयतेवर व तांत्रिक बाबींवर चालते. त्यामुळे त्यांना ना कामाचे श्रेय मिळते, ना प्रसिद्धी.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई