पनवेलमधील २५७ दिव्यांगांना शिधापत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:18 AM2018-12-06T00:18:05+5:302018-12-06T00:18:13+5:30

महसूल विभागाच्या वतीने पनवेल परिसरामधील २५७ दिव्यांगांना व विधवांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

Ration cards to 257 of Panvel's people | पनवेलमधील २५७ दिव्यांगांना शिधापत्रिका

पनवेलमधील २५७ दिव्यांगांना शिधापत्रिका

Next

पनवेल : महसूल विभागाच्या वतीने पनवेल परिसरामधील २५७ दिव्यांगांना व विधवांना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.
महसूल विभागाच्या वतीने अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यांग नागरिकांमधील गुणवत्ता पाहून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांचा त्यांना जास्तीत जास्त लाभ होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून सर्वांनी मदत केल्यास त्यांना सामाजिक सुरक्षितता प्राप्त होऊ शकते, असे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ होऊ शकतो. लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिकेची झेरॉक्स, सिव्हिल सर्जनचा दिव्यांग दाखला, अर्जदार यांच्या वयाचे दाखले, अर्जदार यांच्या मुलांच्या वयाचे दाखले, स्थानिक रहिवासी दाखला, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक अकाउंट नंबर, तलाठी पंचनामा, लाइट बिल, सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत अशा सर्व गोष्टी आॅनलाइन केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याचेसुद्धा पुरवठा अधिकारी स्मिता जाधव यांनी सांगितले. तसेच निवडणूक शाखेतील लेखनिक श्रीकांत इचके यांनी कार्यक्र मात निवडणूक ओळखपत्र मिळण्यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धतीची आणि त्याचे मिळणारे लाभ याची माहिती उपस्थितांना दिली.
>जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून तहसीलदार दीपक आकडे यांच्या सूचनेनुसार दिव्यांग बांधवाना महसूल कार्यालयाच्या विविध विभागातील त्यांना मिळणाºया शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, तसेच शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.
- स्मिता जाधव,
नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी

Web Title: Ration cards to 257 of Panvel's people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.