चक्क रेशनच्या तांदळाची होतेय बाजार समितीत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 09:19 AM2023-06-29T09:19:01+5:302023-06-29T09:19:14+5:30

Ration Rice : शासनाने रेशनिंगवर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तांदुळाचा काळा बाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये छापा मारून १,०२० किलो रेशनिंगचा तांदूळ जप्त केला

Ration rice is being sold in the market committee | चक्क रेशनच्या तांदळाची होतेय बाजार समितीत विक्री

चक्क रेशनच्या तांदळाची होतेय बाजार समितीत विक्री

googlenewsNext

नवी मुंबई :  शासनाने रेशनिंगवर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तांदुळाचा काळा बाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये छापा मारून १,०२० किलो रेशनिंगचा तांदूळ जप्त केला असून, या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
या प्रकरणी ख्वाजा शेख व चत्रभुज भानुशाली या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बाजार समितीमध्ये रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार होत असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एम. तडवी यांना मिळाली होती. पोलिसांनी २६ जूनला धान्य मार्केटमध्ये छापा मारून ३४ गोण्यांमधील १,०२० किलो तांदूळ जप्त केला आहे. 

पोलिसांनी जप्त केलेला तांदूळ 
n सागर डबल तडका तूरडाळ लिहिलेल्या ११ गोणींमध्ये तांदूळ.
n लायन ब्रँड लिहिलेल्या ५ गोणी
n स्वस्तिक प्रीमियम क्वालिटी पल्सेल लिहिलेल्या ३ गोणी
n व्हाइट एलिफंट लिहिलेल्या २ गोणी, हिरवा नाव लिहिलेल्या २ गोणी
n गुरुकृपा, मुम्बा, तुलसी, लक्झरी, केके गोल्ड, सराईराज, मुरली लिहिलेल्या ११ गोणी

Web Title: Ration rice is being sold in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.