पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज; ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:13 AM2018-02-17T03:13:21+5:302018-02-17T03:13:36+5:30

विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

Ready for the PM's welcome; The possibility of the presence of 30 thousand viewers | पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज; ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यंत्रणा सज्ज; ३० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता

Next

नवी मुंबई : विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्टÑीय विमानतळाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची जय्यत तयारी सिडकोसह रायगड जिल्हाधिकारी व नवी मुंबई पोलिसांनी चालवली आहे. कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदरच पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान प्रथमच नवी मुंबईत येणार असल्याने ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता आहे. त्यांची अनेक ठिकाणी तपासणी करुनच प्रेक्षक दालनापर्यंत सोडले जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने बॉम्ब शोधक पथकामार्फत संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आलेली आहे. शिवाय कार्यक्रमाच्या काही तास अगोदर देखील पुन्हा सुरक्षेची खातरजमा केली जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांना सोबत कोणतीही वस्तू घेवून येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची पिशवी, बाटली यासह मोबाइलला देखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या आगमनाकरिता तीन हेलिपॅड तयार करण्यात आले असून त्या परिसरात सर्वसामान्यांना प्रवेशबंदी आहे. गेली अनेक वर्षांपासून विमानतळाच्या कामाच्या सुरु असलेल्या प्रक्रियेला मागील सात महिन्यात अधिक गती देण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाचे भूमिपूजन केले जात आहे. नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातून प्र्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. यादरम्यान वाहतूककोंडी होवू नये याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.
- अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची वाहने किल्ला जंक्शन येथून कोंबडभुजे गावाच्या रस्त्यावरुन कार्यक्रमस्थळाकडे सोडली जाणार आहेत.
- प्रेक्षकांना उलवे गावाकडून जाणाºया रस्त्यानजीकचा टीआरपीएल कंपनीच्या रस्त्यावरुन प्रवेश दिला जाणार आहे. त्याठिकाणच्या मैदानावर प्रेक्षकांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे.
- उलवे गावातून दुचाकी वाहनांसाठी पार्किंगच्या स्थळापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे.
- कोकण, पुणे, पनवेल, उरण येथून कार्यक्रमासाठी येणाºया वाहनांना जुना पनवेल - उरण मार्गाने दापोली-पारगाव-डुंगी-खालचा ओवळा मार्गाने कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग स्थळापर्यंत येवू शकतात.
- आम्रमार्ग ते उरण फाटा मार्गाने ये-जा करणाºया जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर उरण फाटा येथून आम्रमार्गावरुन जेएनपीटीकडे जाणाºया जड, अवजड वाहनांना प्रवेशबंदी करुन ती सीबीडी-कळंबोली मार्गे वळवण्यात आली आहेत.
- गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे ये-जा करणाºया वाहनांना प्रवेशबंदी करुन ती पर्यायी गव्हाण फाट्याकडून डी पॉर्इंट मार्गे कळंबोली सर्कलकडे वळवली आहेत.

Web Title: Ready for the PM's welcome; The possibility of the presence of 30 thousand viewers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.