खारघरमध्ये ७९२ तास गायनाचा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:20 AM2019-12-19T00:20:14+5:302019-12-19T00:20:31+5:30
८०० कलाकारांचा सहभाग : २२ डिसेंबरपर्यंत ८९५ तासांचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : राष्ट्रीय एकात्मता, बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कॅम्पस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्तदान या ज्वलंत सामाजिक विषयांच्या प्रचारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये गीतगायनाचा उपक्रम सुरू आहे. बुधवारी सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तास दोन मिनिटांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर नवीन विश्वविक्र माची नोंद करण्यात आली. या संगीत मैफिलीमध्ये आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त गायकांनी सहभाग घेतला.
विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून १५ नोव्हेंबरपासून ही संगीत मैफील सुरू आहे. देशभरातील विविध कानाकोपऱ्यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आदीसह वेगवगेळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीत गीतांचा सहभाग आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्डरेकॉर्डमध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्र माची नोंद चीन देशाच्या नावावर होती. या उपक्र मात सहभागी झालेल्या गायकावर नजर ठेवण्यासाठी चार कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत ९५०० पेक्षा जास्त विविध प्रकारची गीते या ठिकाणी गायली गेली आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, आसामी, राजस्थानी, पंजाबी आदीसह विविध प्रकारच्या गीतांचा सामावेश होता. २२ डिसेंबरपर्यंत ही मैफील सुरू राहणार असून, ८९५ तास न थांबता गायनाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे. शेवटच्या दिवशी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम या ठिकाणी हजर राहणार आहेत. आतापर्यंत ८०० गायकांनी सहभाग घेतला असून, शेवटच्या दिवसापर्र्यंत ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा विश्वविक्रम पूर्ण करण्यासाठी विराग वानखेडे, वंदना वानखेडे, रीना अग्रवाल, राहुल सोनावणे आदी परिश्रम घेत आहेत.
विश्वविक्रमासोबत समाजजागृतीही
च्या उपक्र मांतर्गत बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कॅम्पस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्तदान यासंदर्भातही जनजागृती केली जात आहे. त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत.
च्या उपक्र माचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्र माची नोंद करण्यात आली आहे. हे विक्र म राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत.