शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 4:37 PM

कलिंगडची आवकही वाढली

नवी मुंबई : बाजार समितीचे फळ मार्केट नवी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विक्रमी ६०,८६८ पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये ४७,४७५ पेटी हापूस आंब्याचा समावेश आहे. मुहूर्ताला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असून आंब्याबरोबरच कलिंगड, खरबूज यांची आवकही वाढली आहे.

देशात आंब्याची सर्वाधिक उलाढाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. प्रत्येक वर्षी ५०० कोटीपेक्षा जास्त आंबा येथे विकला जातो. येथून जगभरातही आंबा पाठविला जातो. आंबा हंगामामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यावर्षी चक्क ६०,८६८ पेट्यांची आवक झाली असून हा आतापर्यंतचा मुहूर्ताचा विक्रम आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होत आहे. ४ ते ८ डझनची पेटी १५०० ते ४ हजार रुपये डझन दराने विकली जात आहे.

दक्षिणेकडील राज्यातून १३,३९३ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. दक्षिणेकडून बदामी, लालबाग, तोतापुरी व कर्नाटकी आंब्याची आवक होत आहे. बाजार समितीचे फळ मार्केट आंबामय झाले आहे. आंब्याबरोबर इतर फळांचीही आवक वाढली आहे. प्रतिदिन ७०० ते ८०० कलिंगड, २०० ते ३०० टन खरबूजची आवक होत आहे. द्राक्ष, अननस, संत्री, पपई यांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिलमध्ये आवक कमी होणार

मुंबईमध्ये ३१ मार्चपर्यंत आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये आवक कमी होण्याची शक्यता असून मेमध्ये मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होणार आहे. जूनअखेरपर्यंत आंब्याची आवक सुरू राहणार आहे.गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला पहिल्यांदाच ६० हजारपेक्षा जास्त पेट्यांची आवक झाली असून ग्राहकांचाही प्रतिसाद वाढला आहे. आंब्याबरोबर कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्ष यांचीही आवक वाढली आहे.- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट

आंब्याचे एपीएमसीमधील दर पुढीलप्रमाणे

हापूस - १५०० ते ४ हजार रुपये पेटीबदामी - १२० रुपये किलो

लालबाग ५० ते ६० रुपये किलोतोतापुरी ४० ते ५० रुपये किलो

कर्नाटकचा आंबा - ७० ते १३० रुपये किलो

इतर फळांचे होलसेलमधील प्रति किलो बाजारभाव

फळ - बाजारभाव

कलिंगड ६ ते १२

अननस २० ते ४५द्राक्ष ४० ते ६०

पपई १६ ते ३०संत्री ३० ते ७०

खरबूज २० ते ३०

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई