अतिक्रमणे हटवून २४ लाखांची वसुली

By admin | Published: January 22, 2017 02:59 AM2017-01-22T02:59:27+5:302017-01-22T02:59:27+5:30

पनवेल शहर महापालिका झाल्यापासून परिसरातील अतिक्रमणावरील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शेकडो कारवाईतून अतिक्रमणविरोधी विभागाने तब्बल २३ लाख ३७ हजार

Recovery of 24 lakhs by deleting encroachment | अतिक्रमणे हटवून २४ लाखांची वसुली

अतिक्रमणे हटवून २४ लाखांची वसुली

Next

- मयूर तांबडे,  पनवेल

पनवेल शहर महापालिका झाल्यापासून परिसरातील अतिक्रमणावरील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शेकडो कारवाईतून अतिक्रमणविरोधी विभागाने तब्बल २३ लाख ३७ हजार रुपयांचा शुल्क वसूल केला आहे. यापुढेही अतिक्र मणांवर कारवाई सुरू ठेवत त्यांच्याकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे.
पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात फेरीवाल्यांनी हैदोस घातला होता. ठिकठिकाणी अतिक्र मण करून रस्ते, फुटपाथ काबीज करण्यात आले होते. अनेक ठिकाणच्या जागा हॉटेलचालक, शिवणयंत्रचालक, दुकानदार, हातगाडी, टपरीचालक यांनी बळकावली होती. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असे. रस्त्यावरून चालताना अनेकदा नागरिकांना अपघाताचा सामनाही करावा लागत असल्याच्या घटना ताजा आहेत. दुकानांच्या समोरील सामायिक वापराच्या जागेचा (मार्जिनल स्पेस) ताबा स्वत:कडे ठेवला जात असे. सामायिक वापराच्या जागेत टेबल-खुर्च्या मांडून अनेकांनी वर्षोनुवर्षे आपला व्यवसाय थाटला होता. नगरपालिका अस्तित्वात असताना परिसरातील नागरिक व विविध संस्थांनी पालिकेवर मोर्चे काढून अतिक्रमण हटविण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, तात्पुरती कारवाई केली जात असे व दुसऱ्या दिवशी परिस्थिती पुन्हा जैसे थे व्हायची. मात्र, १ आॅक्टोबर, २०१७ रोजी पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले व आता पनवेल परिसर अतिक्रमणमुक्त पाहायला मिळेल, या आशेत पनवेलकर होते. पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सुरुवातीलाच पनवेलकरांच्या अपेक्षेला दाद देत अतिक्रमण दूर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांचे व अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुक्तांनी कोणालाही न जुमानता कारवाई सुरू ठेवली. गेल्या तीन महिन्यांपासून पनवेल शहर, खारघर, नवीन पनवेल, कामोठे, आदी भागांतील बेकायदेशीर हजारो फलक, फ्लेक्स काढण्यात आले आहेत. तर खारघर, नवीन पनवेलमध्ये अतिक्रमणविरोधात कारवाई करत त्यांच्याकडून
अतिक्र मण शुल्क वसूल करण्यात येत असून तब्बल २३ लाख ३७ हजारांची वसुली करण्यात आली आहे.

आपण व्यापाऱ्यांना अतिक्र मण काढण्यासंदर्भात रिक्षा फिरवून व अन्य मार्गाने अनेकदा आवाहन केले होते. मात्र, काहींनी
अतिक्र मण काढले नाही. त्यामुळे तेथे जाऊन अतिक्र मण करणाऱ्यांना समज देऊन शुल्क वसूल केले जात आहे. पनवेल परिसराला
अतिक्र मणमुक्त करून नागरिकांना स्वच्छ, सुंदर पनवेल पाहावयास मिळणार आहे. मीडियानेही सहयोग दिला आहे.
- सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल महापालिका.

Web Title: Recovery of 24 lakhs by deleting encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.