म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप-शेकाप आघाडीच्या रीना  शिरधनकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:26 PM2023-10-14T13:26:55+5:302023-10-14T13:27:20+5:30

म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकाप -भाजप आघाडीच्या रीना शिरधनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

Reena Shirdhankar of BJP-Shekap alliance as Mathavali Gram Panchayat Sarpanch | म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप-शेकाप आघाडीच्या रीना  शिरधनकर

म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप-शेकाप आघाडीच्या रीना  शिरधनकर

मधुकर ठाकूर

उरण : म्हातवली ग्रामपंचायत सरपंचपदी शेकाप -भाजप आघाडीच्या रीना शिरधनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उरण तालुक्यातील ७ सदस्य संख्या असलेल्या  म्हातवली ग्रामपंचायतीची निवडणूक २०२१ साली झाली आहे.या निवडणुकीत शेकाप-भाजप आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे सदस्यांच्या बळावर दोन्ही पक्षांच्या अंतर्गत झालेल्या समझोत्यानुसार सरपंच पदही अडीच- अडीच वाटून घेण्यात आले होते.

समझोत्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी सरपंच पद शेकापकडे सोपविण्यात आले होते.अडीच वर्षांनंतर शेकापच्या या सरपंच रंजना पाटील यांनी राजीनामा दिला.त्यानंतर रिक्त झालेल्या पुढील अडीच वर्षांसाठी सरपंच पदासाठी शेकाप -भाजप आघाडीच्या रीना शिरधनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  याप्रसंगी उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर ,उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह ,उरण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी , माजी नगरसेवक नवीन राजपाल ,माजी नगरसेवक राजू ठाकूर ,महेश घरत ,रुपेश शिरधनकर ,दर्शन घरत, प्रकाश कांबळे, प्रदीप थळी ,ग्रामसेवक ज्योती  फोफेरकर, माजी सरपंच रंजना पाटील , म्हातवली  ग्रामपंचायत उपसरपंच पराग म्हात्रे ,सदस्य राकेश  म्हात्रे ,सदस्य अनंत  घरत ,सदस्य चेतन नावलगी , सदस्या नीलिमा  थळी, सदस्या कस्तुरी भोजने आदी उपस्थित होते.

Web Title: Reena Shirdhankar of BJP-Shekap alliance as Mathavali Gram Panchayat Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.