- वैभव गायकरपनवेल : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा, कलम ३७० रद्द केल्याने देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. भारताचा अविभाज्य घटक आणि पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरबाबत प्रत्येकाला आकर्षण असून तेथील पोषाख, राहणीमान आदीचे सर्वांनाच आकर्षण असते. मूळ काश्मिरी मात्र देशातील विविध राज्यांत विखुरलेल्या काश्मिरी पंडित समाजाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले आहे. त्या अनुषंगाने खारघरमध्ये काश्मिरी पंडित असोसिशनच्या माध्यमातून शारदा सदन या समाजमंदिरात काश्मिरी पंडित रहिवाशांचे जीवनमान दाखविणारी आर्ट गॅलरी सध्या सर्वांचे लक्ष केंद्रित करीत आहे.काश्मीरमधील अतिरेकी कारवायांमुळे अनेकांना आपले घरे सोडावे लागले आहे. भारतभरात विविध ठिकाणी आज काश्मीर पंडित समाज वास्तव्यास आहे. खारघर शहरात सेक्टर ८ मध्ये काश्मिरी पंडित रहिवाशांचे कुलदैवत शारदादेवीच्या नावाने शारदा सदन उभारण्यात आले आहे. २०१६ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सदनाचे उद्घाटन करण्यात आले. शारदा सदनमध्ये उभारण्यात आलेली आर्ट गॅलरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काश्मिरी पंडित समाजाचे राहणीमान, रीतिरिवाज, पोषाख, मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन उभारले आहे. याकरिता काश्मिरी पंडित असोसिएशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. शारदा सदनमधील दुसऱ्या मजल्यावर शारदा गॅलरी आॅफ आर्ट कल्चर उभारून त्या ठिकाणी काश्मिरी संस्कृतीचे दर्शन घडविणाºया विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १८७० मधील विविध महत्त्वाची छायाचित्र, झेलम नदीचे फोटो, शारदापीठ (सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये आहे), काश्मीरचे पारंपरिक वाद्य ढोलक (तुंबकनर), घागर, गालिचा, काश्मीर पंडित रहिवाशांचे पारंपरिक पोषाख, फेरण आणि नारंग, फुलदाणी, काश्मीरचे पारंपरिक पेय (कावा) तयार करण्यासाठी समावार, पितळेची थाळी (ताट), चुल्हा (दान), कप (खोस), परात (पहरात), रांगोळी (व्युग) आदीसह काश्मिरी पंडित समाजाच्या दैनंदिन वापरातील पारंपरिक वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.काश्मिरी पंडित असोसिएशनचे सदस्य चांद भट प्रदर्शनाबाबत माहिती देताना म्हणाले, आमच्या असोसिएशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांचे जीवनमान, राहणीमान, पोषाख, दैनंदिन वापरातील वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. समाजाला काश्मिरी पंडित समाजाच्या खºया खुºया संस्कृतीची ओळख पटावी, या हेतूने शारदा गॅलरी आॅफ आर्ट उभारण्यात आल्याचे या वेळी भट यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आर्ट गॅलरी पाहण्याची संधीखारघर शहरातील सेक्टर ८ मधील शारदा सदनमध्ये (काश्मिरी पंडित समाजमंदिर) उभारण्यात आलेली आर्ट गॅलरी पाहण्याची संधी असोसिएशनच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे असोसिएशनचे सदस्य चांद भट यांनी सांगितले.
खारघरमध्ये अवतरले काश्मीरचे प्रतिबिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:00 AM